डॉ. रमेश पोखरियाल
डॉ. रमेश पोखरियाल
देश-विदेश

एका विद्यापीठात 300 पेक्षा अधिक महाविद्यालये नसणार

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

नव्या शिक्षण धोरणानुसार एका विद्यापीठाला 300 हून अधिक महाविद्यालयांना संलग्नता देता येणार नाही. महाविद्यालयांना अधिक स्वायत्तता देण्यात येईल व संलग्न करण्याची पद्धत हळूहळू बंद करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. ते कोविड-19 नंतरचे शिक्षण या विषयावर आभास माध्यमाद्वारे बोलत होते. New Education Policy

Union minister Ramesh Pokhriyal Nishank Says Universities can not affiliate more than 300 colleges

स्वत:चा एक अनुभव सांगताना ते म्हणाले, मी अलिकडेच एका विद्यापीठाला भेट दिली होती. तेव्हा तेथील कुलगुरूंना विचारले की या विद्यापीठाशी किती महाविद्यालये संलग्न आहेत, तर ते म्हणाले 800 पदवी महाविद्यालये संलग्न आहेत. मला वाटले मी चुकीचे ऐकले. मी पुन्हा विचारले तर ते म्हणाले 800 महाविद्यालये. तो दीक्षांत समारंभ होता. मला आश्चर्यच वाटले. एखाद्या कुलगुरूंना 800 महाविद्यालयांच्या 800 प्राचार्यांची नावे तरी लक्षात राहू शकतील का?

पोखरियाल पुढे म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येने महाविद्यालयांच्या कारभारावर एक कुलगुरू कशी काय देखरेख करू शकतील? म्हणूनच नव्या शिक्षण धोरणानुसार आम्ही यावर टप्प्या-टप्प्याने काम करणार आहोत. नव्या धोरणानुसार एका विद्यापीठाकडे 300 हून अधिक महाविद्यालयांची संलग्नता नसेल. यासाठी आम्हाला विद्यापीठांची संख्या वाढवावी लागली तर ती वाढविण्यात येईल.

केंद्र सरकारने गत महिन्यात नवीन शिक्षण धोरणाला मान्यता दिली आहे. यानुसार, 15 वर्षांच्या कालावधीत हळूहळू संलग्नता पद्धत बंद करण्यात येणार आहे व महाविद्यालयांना श्रेणीनिहाय स्वायत्तता देण्याची यंत्रणा टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यात येईल. यानुसार महाविद्यालयांना पारदर्शक पद्धतीने ग्रेडेड अ‍ॅक्रिडिटेशन देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com