
नवी दिल्ली | New Delhi
काश्मीरमधील (Kashmir) अनंतनाग जिल्ह्यातील (Anantanag) कोकरनागमध्ये (Kokarnagar) गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे (Ambush with Terrorist) . येथे जंगलातील टेकड्यांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. अनंतनागमध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईची पोस्ट रिट्वीट करत राजीव चंद्रशेखर यांनी पोस्ट केली आहे.
त्यांनी लिहिले आहे की, "भारताचे अनेक शत्रू आहेत. आपल्याला रोखणे एवढेच त्यांचे ध्येय आहे. पण त्यांना माहीत असावे की, भारतीय सैन्याकडे आता हायटेक आणि घातक अद्ययावत हत्यारे आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, भारतीय सैन्याच्या नादी न लागण्यातच शहाणपण असेल. यह न्यू इंडिया है. भारत न डरेगा, न पीछे हटेगा."
पुढे त्यांनी असे ही लिहिले आहे, भारताला युद्ध नको आहे. पण, तरीही तुम्ही भारताच्या नादी लागत असाल तर तुमची मुले अनाथ होतील, या शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर इशारा दिला. तसेच या ट्विटमध्ये न्यू इंडियाचा हॅशटॅगही वापरला आहे.
दरम्यान, जम्मू काशमीरच्या अनंतनाग येथील कोकेरनाग जंगलात बुधवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. कोकरनागमध्ये दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली. तेव्हापासून चकमक सुरू आहे.
या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर, या चकमकीत, १९ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धोनचक आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून मुजम्मील भट्ट हे शहीद झाले. या कारवाईदरम्यान आणखी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.