गृहमंत्री अमित शाह
गृहमंत्री अमित शाह
देश-विदेश

गृहमंत्री अमित शाह करोना पॉझिटिव्ह

स्वतः केले ट्विट

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. Union Home Minister Amit Shah Covid-19 tests positive अशी माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

'करोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी' असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com