NRA ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

बेरोजगार आणि नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना होणार फायदा
NRA ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्यांदा NRA ची संकल्पना मांडली होती.

देशात सरकारी नोकरीसाठी, बॅंकांच्या नोकरीसाठी द्याव्या लागणार्‍या वेगवेगळ्या परीक्षा रद्द करून एकच कॉमन एन्टरन्स टेस्ट (common entrance test ) म्हणजे सीईटीची परीक्षा (CET exams) होईल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना सरकारी आणि खाजगी संस्थांकडून द्याव्या लगणार्‍या विविध परीक्षांचा गोंधळ कमी होणार आहे. एनआरआय (NRA) ची स्थापना करायला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. all recruitment agencies will have only one common eligibility test.

या सीईटीचीचे मार्क्स (CET) तीन वर्षांसाठी व्हॅलिड राहतील. याचा फायदा आता देशातील अनेक बेरोजगार आणि नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना होणार आहे. तसेच उमेदवारांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी दोन अतिरिक्त दिल्या जाणार आहे. ज्यामध्ये चांगले गुण असतील ते अंतिम म्हणून ग्राह्य धरले जातील जातील.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com