गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, दोघांचा मृत्यू, VIDEO आला समोर

गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, दोघांचा मृत्यू, VIDEO आला समोर

सुरत | Surat

गुजरात (Gujrat) च्या बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून (Under Construction Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला. ओव्हर ब्रिजचे पाच गडर्स एकाच वेळी खाली कोसळले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथील आरटीओ सर्कल येथे या पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान पुलाचा मोठा भाग कोसळून खाली पडला. या अपघातात बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक झाली. अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ बचाव पथके रवाना करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरात काँग्रेस नेते अमित चावडा यांनी गुजरात सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, पालनपूर आरटीओ सर्कलजवळील ओव्हरब्रिज कोसळला. रिक्षाचालकासह तीन जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आता पुन्हा अधिकारी बदलणार, हेच होणार का?

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com