UGC Guidelines 2021 : UGC ने महाविद्यालयांना दिले महत्वाचे निर्देश, 'या' तारखेपासून सुरु होईल नवीन शैक्षणिक वर्ष

UGC Guidelines 2021 : UGC ने महाविद्यालयांना दिले महत्वाचे निर्देश, 'या' तारखेपासून सुरु होईल नवीन शैक्षणिक वर्ष

दिल्ली l Delhi

विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC) ने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे.

विद्यापीठांना ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि नवीन शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिक्त जागा भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. तसेच नव्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता १ डिसेंबर २०२१ पर्यंत सादर करणे गरजेचे आहे.

UGC Guidelines 2021 : UGC ने महाविद्यालयांना दिले महत्वाचे निर्देश, 'या' तारखेपासून सुरु होईल नवीन शैक्षणिक वर्ष
दहावीनंतर काय? गोंधळात पडला असाल तर नक्की वाचा

याव्यतिरिक्त, UGC ने असेही म्हटले आहे की कोरोना साथीचा विचार करता, विद्यापीठे १ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश मागे घेण्यासाठी कोणत्याही रद्दीकरण शुल्काची आकारणी करु शकणार नाहीत. मात्र या तारखेनंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश मागे घेतल्यास विद्यापीठे जास्तीत जास्त १००० रुपये म्हणून शुल्क आकारू शकतात. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख राहील.

करोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे यंदाही शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणं शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येईल. UGC नं या संदर्भात मार्गदर्शक सूचा देखील जारी केल्या आहेत. तसेच करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करताना समन्वय ठेवण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत.

UGC Guidelines 2021 : UGC ने महाविद्यालयांना दिले महत्वाचे निर्देश, 'या' तारखेपासून सुरु होईल नवीन शैक्षणिक वर्ष
दहावीचा निकाल जाहीर; कशी असेल अकरावी प्रवेशाची प्रक्रिया? जाणून घ्या

दरम्यान, काही राज्य मंडळाने १२ वीचे निकाल आधीच जाहीर केले आहेत. तसेच इतर राज्ये निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. बहुतेक राज्य मंडळे ३१ जुलै २०२१ पर्यंत बारावीचा निकाल जाहीर करतील. हिमाचल प्रदेश, बिहारने १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करेल. अशी माहिती UGC ने दिली आहे.

देशभरात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona second wave) परिणाम शाळा (Schools) आणि महाविद्यालयांच्या (College) परीक्षांवर झाल्याचं दिसून आलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया कशा पार पाडायच्या यावर खलबतं झाली. शेवटी त्या-त्या राज्यांतील सरकारांनी यावर तोडगा काढला. महाराष्ट्रात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com