सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
देश-विदेश

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 सप्टेंबरला सुनावणी

यूजीसीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

करोना संकट असताना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. UGC final-year exam Next hearing in Supreme Court on September 30

युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याविरोधातील याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. आगामी तीन दिवसांत सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्रात सरकारची नकारात्मक भूमिका असतानाही यूजीसीने परीक्षा घेण्याचे आदेश दिले. मात्र राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

सर्वोच्चन्यायालयात या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. मात्र याबाबत निकाल लागला नाही. महाराष्ट्र सरकारतर्फे वकील अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला. विद्यार्थी विरुद्ध युजीसी प्रकरणात ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी सरकारची बाजू मांडली. आता महाराष्ट्र फक्त अंतिम परीक्षेसंबंधित वाद आहे. जर तेथे 42 अभ्यासक्रम असतील तर विद्यार्थ्याने 36 पूर्ण केले आहेत. मार्चपर्यंत त्याचा सीजीपीए सरासरी पाच सत्रांचा असेल. ज्या विद्यार्थ्याने बहुतेक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्याला अंतिम परीक्षा न देता पदवी दिली जाईल, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्याचेदातार यांनी सांगितले.

मकरोनासंदर्भात महाराष्ट्रातील परिस्थिती भयानक आहे. दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्याला पदवी द्यावी, असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं नाही. फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारची ही भूमिका आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम परीक्षा घेण्याची यूजीसीने दिलेली सूचना मनमानी आणि अवास्तव आहे, असं म्हणत दातार यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com