युएईचा एक निर्णय अन् भारताची भरली धडकी

युएईचा एक निर्णय अन् भारताची भरली धडकी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

सध्या जगातील सर्वच देश महागाईच्या (Inflation) संकटात सापडले आहेत. तेलाचे दर (Oil Price) दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. आता सौदी अरेबियाने (UAE) तेलाच्या वाढत्या किंमतीवर लगाम लावण्यासाठी कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भारतासह संपूर्ण जगभराला धडकी भरली आहे...

तेलाचा (Oil) तुटवडा नाही तर कच्च्या तेलाचे उत्पादन कशाला वाढवायचे, असे सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान (prince faisal bin farhan) यांनी नमूद केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

युएईचा एक निर्णय अन् भारताची भरली धडकी
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

दरम्यान, जगात तेलाच्या किंमती वाढण्यामागे रशिया आणि युक्रेनचे युद्ध (Russia-Ukraine War) हे प्रमुख कारण आहे. रशिया हा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशियावर निर्बंध लावण्यात आल्याने जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

युएईचा एक निर्णय अन् भारताची भरली धडकी
Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

मागील वर्षाच्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर ७० टक्क्यांनी वधारले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर जे कच्चे तेल प्रती बॅरल ११० डॉलर होते. त्यात आता २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com