जम्मू-काश्मीर : दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

कुटुंबाच्या आवाहनानंतर दोघांनी केले आत्मसमर्पण
जम्मू-काश्मीर : दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

दिल्ली । Delhi

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूकांच्या निकालांदरम्यान, कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी दोन स्थानिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहानानंतर आत्मसमर्पण केलं आहे. या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दारूगोळा जप्त केला आहे.

जम्मू-काश्मीरचे राजकीय स्थान बदलल्यानंतरही तिथल्या दहशतवादाच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमकी आणि पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार होत आहे आणि यात दोन्ही बाजूचे जवान आणि सामान्य नागरिक जीव गमावत आहेत. मात्र नुकत्याच कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चालू असलेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

अटक करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असून सुरक्षादलांना त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि हातबॉम्ब मिळाले आहेत. त्यांनी ते जप्त केले आहेत. असे सांगितले जात आहे की, या दोघांच्या कुटुंबांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. कुलगाम इथे सुरक्षादलांची लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांशी चकमक चालू होती ज्यादरम्यान ही घटना घडली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. ज्याअंतर्गत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com