एअर इंडिया
एअर इंडिया
देश-विदेश

केरळ विमान दुर्घटना : जखमींपैकी दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

अन्य सर्वांची करोना चाचणी होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली | New Delhi

एअर इंडियाच्या विमान अपघातातील दोघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामुळे इतर सर्वांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान या अपघातात आतापर्यंत २ पायलट्स सह १८ जणांंचा मृत्यु झाला आहे तर १२७ जण रुग्णालयात आहेत. विशेष म्हणजे जखमीं मधील २ जणांना करोनाची लागण झाल्याचे समजत आहे, यामुळे अन्य जखमींची व बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वांची करोना चाचणी होणार आहे.

काल रात्री केरळच्या करीपुर येथे कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. यानंतर लागलीच अनेकजण बचावकार्यात सहभागी झाले. या बचावकार्यात सहभागी असणार्‍या सर्वांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घ्यावे, राज्य सरकार सर्वांच्या करोना चाचण्या घेणार आहे अशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी दिली आहे.

या विमानात १८० प्रवासी आणि ६ क्रू सदस्य होते. जखमी प्रवाशांना मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जणांना प्रथमोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com