केरळमध्ये झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

केरळमध्ये झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

तिरुवनंतपुरम / Thiruvananthapuram - केरळमध्ये झिका विषाणूचे (Zika Virus) आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये जुलै महिन्याच्या सुरवातीला झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळल्यानंतर केरळातील सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (health minister Veena George) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मंगळवारी खासगी रुग्णालयात काम करणार्‍या एका डॉक्टरला आणि एका 16 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. एकूण 23 रुग्णांना झिका विषाणूची लागण झाली आहे.

लक्षणे -

ताप आणि अंगावर लाल फोड येणे, स्न्यायू दुखणे, सांधे दुखी आणि डोके दुखी हे झिकाची लक्षणे आहेत.झिका एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. डास दिवसभरातून एकदाच मानवाला चावतो. रोगाची लक्षणे दोन ते सात दिवस राहतात. झिकाची लक्षणे दिसण्यासाठी तीन ते 14 दिवस लागतात. तर बहुतांश रुग्णांमध्ये झिकाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. या विषाणुमुळे रोगी व्यक्तीचा क्वचित मृत्यू होतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com