अखेर Twitter ने नेमला तक्रार अधिकारी; सरकारसोबतचा वाद निवळण्याची चिन्हं

अखेर Twitter ने नेमला तक्रार अधिकारी; सरकारसोबतचा वाद निवळण्याची चिन्हं

दिल्ली | Delhi

केंद्र सरकारने (Central Govt) जारी केलेले नवे आयटी नियम (New IT Rules) ट्विटरने (Twitter) अखेर स्वीकारले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आयटी नियमांचे पालन करत ट्विटरने भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये सुरु झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले आहे की, त्यांनी विनय प्रकाश (Vinay Prakash) यांची तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारने २५ फेब्रुवारी रोजी नवीन कायदे लागू केले होते. हे नियम २५ मेपूर्वी म्हणजेच ३ महिन्यांत पाळले जायचे होते, परंतु ट्विटरने मुदत संपदल्यानंतर ४६ दिवसांनी या नियमांचे पालन केले आहे.

दरम्यान, यापूर्वी २७ जून रोजी ट्विटर इंडियाचे अंतरिम तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतुर (Dharmendra Chatoor) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन आयटी नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटर इंडियाने त्यांची काही आठवड्यांपूर्वी नियुक्ती केली होती.

भारत सरकारने नवीन आईटी नियमांची घोषणा केली होती. आणि यासोबतच सर्व सोशल मीडिया कंपनीला या नियमांचे पालन करण्यात सांगण्यात आले होते. पण अनेकदा गंभिर चेतावनी देऊन सुदधा ट्विटरने सरकारच्या नियमांचे पालन केले नाही. यानंतर सदर घटना दिल्ली हायकोर्टापर्यंत पोहोचली होती. गुरुवारी या घटनेबाबत सुनावनी करतेवेळी ट्विटरच्या वकीलांनी कोर्टाकडे रेजीडेंस ग्रीवेंस ऑफिसर म्हणजेच आरजीओ नियुक्त करण्यासाठी आठ आठवड्यांचा कलावधी मागितला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com