बस अपघातात २७ जणांचा मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

नवी दिल्ली | New Delhi

चीनमध्ये एक प्रवासी बस उलटल्याने भीषण अपघात (China Bus accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात २७ जणांचा मृत्यू (Death)झाला आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील दक्षिण-पश्चिम भागातील (South Western Area) एका एक्स्प्रेस हायवेवर (Express Highway) हा अपघात घडला. या बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून हा अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास केला जातो आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस (Police) आणि बचाव यंत्रणांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com