आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी CoWIN पोर्टलवर वेगळं प्रमाणपत्र मिळणार, कसं कराल डाउनलोड?

आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी CoWIN पोर्टलवर वेगळं प्रमाणपत्र मिळणार, कसं कराल डाउनलोड?
File Photo

मुंबई | Mumbai

सध्याच्या करोनास्थितीत (COVID19) तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं करोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अर्थात तुमचं करोना लसीकरण प्रमाणपत्र (Corona vaccination certificate) असणं आवश्यक आहे.

दरम्यान आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International travel) आता CoWin पोर्टलवर वेगळं प्रमाणपत्र मिळणार आहे. भारतीय नागरिकांनी (Indian citizen) यापुढे जर आंतरराष्ट्रीय प्रवासाचे प्रमाणपत्र डाउनलोड (international version of Covid 19 certificate) करायचे असेल, ते नागरिक आता CoWin द्वारे डाऊनलोड केलेल्या लसीच्या प्रमाणपत्रात त्यांची जन्मतारीखही नोंदवू शकणार आहेत.

सध्या भारत सरकारकडून ऑनलाईन (online international version of Covid 19 certificate) जे प्रमाणपत्र जारी केले जात आहे, त्यावर नागरिकांच्या जन्मतारखेचा उल्लेख केला जात नाही. संबंधित नागरिकाच्या वयाचा उल्लेख असतो. आता या प्रमाणपत्रावर जन्मतारीखही नोंदवता येणार असल्यामुळे याचा परदेशात जाऊ इचछीणाऱ्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाचे प्रमाणपत्र डाउनलोड करताना मोठा फायदा होणार आहे.

कसं कराल डाउनलोड ?

- सर्वप्रथम तुम्हाला Cowin.gov.in वेबसाइटवर जावं लागेल

- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून लॉग इन करा

- पासपोर्ट क्रमांक आणि पासपोर्टमध्ये लिहिलेली DOB: yyyy/mm/dd ते फॉरमॅटमध्ये लिहून सबमिट करावं लागेल.

- पेज रिफ्रेश होताच, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेलं लसीकरण प्रमाणपत्र सेकंदात डाउनलोड केलं जाईल.

Related Stories

No stories found.