भत्त्यांमध्ये 20 टक्के कपात करा

केंद्राचे मंत्रालयांना निर्देश
भत्त्यांमध्ये 20 टक्के कपात करा

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांना 20 टक्के खर्चकपात करण्याचे लक्ष्य दिले आहे. जाहिराती, प्रसिद्धी, जास्त कामाचा भत्ता, बक्षिसे, देशांतर्गत व विदेशी प्रवास खर्च, किरकोळ देखभाल कामे यांसारख्या बाबींवर खर्चकपात करण्याचे सांगण्यात आले आहे.

या बाबतची यादी सर्व सचिवांना आणि मंत्रालय व विभागांच्या आर्थिक सल्लागारांना पाठवली आहे. उपरोक्त खर्चांसोबतच कार्यालयीन खर्च, भाडे, दर आणि कर, रॉयल्टी, प्रकाशने, इतर प्रशासकीय खर्च आणि साहित्य, रेशन, कपडे आणि छावणी, जाहिरात, छोटे काम, देखभाल, सेवा शुल्क, योगदान आणि इतर शुल्कांचा यात समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.