मन सुन्न करणारी घटना! अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक; १८ जणांचा मृत्यू

मन सुन्न करणारी घटना! अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक; १८ जणांचा मृत्यू

दिल्ली l Delhi

पश्चिम बंगालमध्ये (west bengal) भीषण अपघात (Tragic road accident) झाला आहे. मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे.

पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात (Nadia District) हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात १८ लोकांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात ४० जण एका वाहनात होते. ते अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जात होते. काल रात्री २ च्या सुमारास एका भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांमध्ये ११ पुरुष, ७ महिला आणि एका ६ वर्षीय निष्पापाचा समावेश आहे.

स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामागे नेमकं कारण काय आहे याचा तपास करत आहे. दाट धुके आणि वेग जास्त असल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com