नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाशी संबंधित टूल किट सोशल मीडिया प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशा रवीने

तपासाची माहिती प्रसार माध्यमांना देवू नये, यासाठी दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली आहे. पर्यावरण कार्यकर्ती असणार्या दिशा रवीला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगळुर येथून ताब्यात घेतले होते.टूल किट प्रकरणाच्या तपासात जी माहिती समोर आली आहे, ती प्रसारमाध्यमांना दिली जाऊ नये, अशी विनंती करणारी याचिका दिशा रवीने गुरुवारी आपले वकील अभिनव शेखरी यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.

दिशा रवीने विविध लोकांशी सोशल मीडियावरून केलेले संभाषण प्रसिद्ध करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ग्रेटा थनबर्ग नावाच्या पर्यावरण कार्यकर्तीला दिशा रवीने आंदोलनाची संबंधित टूल किट पुरविली होती. ग्रेटा थम्बुर्गकडून अनवधानाने ही टूल किट सोशल मीडियावर पडली होती. आपली चूक लक्षात आल्यानंतर थम्बुर्ग हिने सदर टूल किट काढून टाकले होते.