आता 60 कि.मी. पर्यंत एकच टोल

टोल नाक्याजवळ राहणार्‍या वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नाही
आता 60 कि.मी. पर्यंत एकच टोल

नवी दिल्ली| New Delhi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी काल एक महत्त्वपूर्ण निर्णय सांगितला. महत्त्वाच्या मार्गावर 60 कि. मिटरच्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. साठ किलो मिटरच्या अंतरावर आता एक टोल नाका असणार असून, महामार्गाजवळ राहणार्‍या वाहनधारकांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना सांगितले. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

येत्या तीन महिन्यात देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार असून महामार्गावर 60 किलोमीटरपर्यंत एकच टोल असणार आहे. त्यापेक्षा जादा टोल नाके एवढ्या अंतरावर असतील तर ते बंद करण्यात येणार आहेत.

महामार्गाजवळ राहणार्‍या नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गाजवळ म्हणजेच टोल नाक्याजवळ राहणार्‍या व सतत टोल नाक्यावरून ये जा करणार्‍या वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com