Tokyo Olympics : लवलिनाचा पराभव आता कास्यपदक मिळणार

कुस्ती, भाला फेकमध्ये पदकाची आशा
Tokyo Olympics : लवलिनाचा पराभव आता कास्यपदक मिळणार

दिल्ली | Delhi

भारतासाठी आजचा दिवस टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) अत्यंत महत्त्वाचा आहे. आज भारताची ऑलिम्पिकमधील (Olympics) सुरुवात सकारात्मक झाली आहे.

स्टार खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी भालाफेकच्या अंतिम फेरीत (Neeraj Chopra Qualifies For Men's Javelin Throw Final) स्थान मिळवले आहे. तर भारतीय कुस्तीपटू रवी दहिया (Ravi Dahiya) आणि दीपक पूनिया (Deepak Punia) यांनी उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. त्याच बरोबर बॉक्सर लवलीना बोरहोगेन सेमीफायनलमध्ये विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश मिळवणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तसेच पुरुष हॉकी संघाच्या पराभवानंतर आज महिला संघ तरी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश करतो का? हे देखील पाहावे लागेल.

दरम्यान, नीरज चोप्राला अंतिम फेरी गाठण्यासाठी नीरज चोप्राला पात्रता फेरीत ८३.५ मीटरचे लक्ष्य होते. पण नीरज चोप्राला अंतिम फेरीत ८६.६५ फेकून चकित केले आहे. नीरज चोप्राने पात्रता फेरीतच स्पष्ट केले आहे की त्याची नजर सोन्यावर आहे. नीरज चोप्रा पात्रता फेरीच्या गट अ मध्ये अव्वल आहे.

भारतीय कुस्तीपटू रवी दहिया आणि दीपक पूनिया या दोघांनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या सामन्यामध्ये विजय मिळवत कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवण्याचा आशा पल्लवित केल्या आहेत. दीपकने तर अगदी शेवटच्या सेकंदामध्ये आपल्या चीन प्रतिस्पर्धकाला धोबीपछाड देत सामना जिंकला. लवलीना आणि सुरमेनेली यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. भारतीय बॉक्सर लवलिना पराभूत झाली. तिला प्रशिक्षकांनी तिला लांबून पंच करण्यास सांगितले. पण टर्कीच्या बॉक्सरने काही उत्तम पंचेसच्या मदतीने दुसरा राउंडही जिंकला. अखेर सामना लवलिनाच्या हातातून निसटल्याने ती फायनलमध्ये जाऊ शकली नाही. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

५७ किलो वजनी गटामध्ये रवी दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा १४-४ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीलाच रवीने वॉलिंटिनोववर ६-० ची आघाडी मिळवली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. रवीने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. रवीच्या डावपेचांसमोर बुल्गेरियन कुस्तीपटू फारच फिका पडल्याचं चित्र सामन्यामध्ये दिसलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com