चोरीसाठी चक्क त्याने 10 किलो वजन केले कमी

चोरीसाठी चक्क त्याने 10 किलो वजन केले कमी

वजन घटवण्यामागे प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. बरेचजण फिट राहण्यासाठी, तंदुरुस्ती राखण्यासाठी वजन कमी (weight lose)करतात. काही जण डॉक्टरांच्या सांगण्यावरून वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात गुजरातमधील (gujarat)एका व्यक्तीने वजन कमी करण्याचे अजब कारण समोर आले आहे. ते म्हणजे त्याला खिडकीतून आत घुसून सहज चोरी करता येऊ शकेल. अहमदाबादमधल्या (Ahmedabad)मोती सिंह चौहाननं चोरी करण्यासाठी 3 महिन्यांत 10 किलो वजन घटवलं.(weight lose)

चोरीसाठी चक्क त्याने 10 किलो वजन केले कमी
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

अहमदाबाद शहरात राहणारा 36 वर्षीय मोती सिंह चौहान हा मोहित मराडिया यांच्या घरी काम करत होता. वारंवार घरी येणे-जाणे असल्यामुळे घरातील सर्व मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची त्याला चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्याने मराडियांच्या घरात चोरी करण्याचे ठरवले. मोतीनं व्हेंटिलेशनच्या खिडकीतून आत जाण्याचं ठरवलं. खिडकीतून सहज आत जाता यावं म्हणून त्यानं 3 महिने डाएट करून 10 किलो वजन घटवलं.

चोरीसाठी चक्क त्याने 10 किलो वजन केले कमी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

वजन कमी करण्यासाठी एक वेळा जेवण

चोरी करण्यासाठी मोती सिंह चौहाननं गेल्या तीन महिन्यांपासून कठोर डाएट केलं होतं. वजन घटवण्यासाठी तो दिवसातून एकदाच जेवत होता. रात्रीचे जेवण त्याने टाळले. व्हेंटिलेशनमधून पार जाण्यासाठी 10 किलो वजन कमी करायचे होते, त्यामुळे त्याला जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. ते त्याने करुन वजन कमी केले आणि चोरी केली.

चोरीसाठी चक्क त्याने 10 किलो वजन केले कमी
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

घरातील सीसीटीव्ही चुकवले, पण...

5 नोव्हेंबरला मोती सिंहनं घरातून 37 लाख आणि मौल्यवान वस्तू लांबवल्या. चोरी करताना मोतीनं सीसीटीव्ही कॅमेरे शिताफीनं चुकवले. त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडायला वेळ लागला. पोलिसांनी आसपासच्या भागांत असलेल्या सीसीटीव्हींचं फुटेज गोळा केलं. त्यावेळी एक जण हार्डवेअरच्या दुकानातून खिडकीच्या काचा तोडण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य घेताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी फोन लोकेशन तपासून पडताळणी केली. त्यात 5 नोव्हेंबरला मोती मोहित यांच्या घरात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com