TMC चे प्रवक्ते साकेत गोखलेंना अटक

TMC चे प्रवक्ते साकेत गोखलेंना अटक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले (Saket Gokhale) यांना मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी (Morbi Bridge Collapse) गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) अटक (Arrest) केली आहे. याबाबत पक्षाचे खासदार डेरेक ओब्रियन (Derek O'Brien) यांनी दावा केला आहे.

साकेत गोखले (Saket Gokhale) यांनी केलेल्या ट्वीटनंतर ही अटकेची (Arreted) कारवाई करण्यात आल्याचा दावा ओब्रियन यांनी केला आहे.

साकेत गोखले सोमवारी विमानाने नवी दिल्लीवरुन जयपूरला पोहोचले होते. गुजरात पोलीस यावेळी राजस्थानमध्ये विमानतळावर त्यांची वाट पाहत उभे होते. विमानतळावर पोहोचताच त्यांच्यावर कारवाई केली, असा दावा ट्विटद्वारे डेरेक ओब्रियन (Derek O'Brien) यांनी केला आहे.

मंगळवारी पहाटे २ वाजता त्यांनी आपल्या आईला फोन करुन पोलीस अहमदाबादला घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना दोन मिनिटांचा तो फोन करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर तो जप्त केला. त्यांचे इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. साकेत यांनी केलेल्या एका ट्वीटप्रकरणी अहमदाबाद सायबर सेलने हा गुन्हा दाखल केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com