
दिल्ली | Delhi
भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. जर तुम्ही पण तिरुपतीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (Tirumala Tirupati Special Darshan Ticket)
तिरुमला तिरुपती देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी विशेष पास सेवा आजपासून म्हणजेच ९ जानेवारी २०२३ रोजी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. आज सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुकिंग सुरू करण्यात येत आहे. ३०० रुपये किंमत असलेल्या विशेष दर्शन तिकिटांची बुकिंग आज करण्यात येत आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन ऑनलाईन तिकिटे बुक करावीत असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
कसं कराल ऑनलाइन बुकिंग?
तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटवर जा
आता यात मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा.
त्यानंतर आता जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा.
तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर सहा अंकी ओटीपी येईल.
आता तो नंबर भरा.
त्यानंतर लॉगिनवर क्लिक करा.
आता तुम्हाला कॅलेंडर दिसेल.
त्यामध्ये तुम्हाला ज्या तारखेचं बुकिंग करायचं आहे ती डेट सिलेक्ट करा.
आता तुम्हाला एक अर्ज दिसेल तो अर्ज काळजीपूर्व भरा.