Kerala Convention Center Explosion: कन्व्हेंशन सेंटरमध्ये लागोपाठ स्फोट; १ जण ठार तर २० हून अधिक जण जखमी

Kerala Convention Center Explosion: कन्व्हेंशन सेंटरमध्ये लागोपाठ स्फोट; १ जण ठार तर २० हून अधिक जण जखमी

केरळ | Kerala

केरळच्या एर्नाकुलम (Kerala, Ernakulam) येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये (Explosion In Convention Center) मोठा स्फोट झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

कलामासेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी नऊच्या सुमारास झाला. पुढच्या काही मिनिटांत एकामागून एक स्फोट झाले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तब्बल तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत.

या स्फोटांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची प्रतिक्रिया आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत.सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विजयन म्हणाले..

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा प्रार्थना सभेत सुमारे दोन हजार लोक जमले होते. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज के यांनी सांगितले की, त्यांनी कलामासेरी स्फोटाबाबत सर्व रुग्णालयांना सतर्क केले आहे. तसेच रजेवर गेलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, एनआयची ४ सदस्यीय टीम घटनास्थळी जात आहे. या टीमसह स्थानिक अधिकारीही घटनास्थळी जाऊन तपास करणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ च्या सुमारास स्फोट झाला. यानंतर पोलिसांची मदत मागण्यासाठी फोन आला होता.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com