यामुळे घाबरला किम जोंग
Andrey Rudakov
देश-विदेश

यामुळे घाबरला किम जोंग

मास्कचा वापर न करणार्‍या नागरिकांना कठोर शिक्षा देण्याचे फर्मान

Ramsing Pardeshi

प्योंगयोंग (उत्तर कोरिया) - Pyongyang (North Korea)

सध्या जगभरात कोरोनाच्या विरोधातील लढाईत मास्क आणि सॅनिटायझर ही प्रमुख अस्त्रे कामी येत आहेत. तसेच या दोन्ही वस्तुंचा वापर करणे अनेक देशांनी बंधनकारक केलेले आहे. दरम्यान, आपल्या देशात एकही कोरोनाबाधित सापडला नसल्याचा दावा करणारा उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याच्या मनात ही कोरोनाबाबतची दहशत बसली आहे. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेऊन त्याने मास्कचा वापर न करणार्‍या नागरिकांना कठोर शिक्षा देण्याचा फर्मान काढला आहे.

उत्तर कोरियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार सणकी हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) कोरोनाच्या भीतीने चिंतीत झालेला आहे. मास्क परिधान करणे त्याने देशातील जनतेला अनिवार्य केले आहे. तसेच मास्क परिधान न करणार्‍या, नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा देण्याची घोषणा केली आहे.

यासंदर्भात रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या वृत्तानुसार मास्क परिधान न करणार्‍या नागरिकांना पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना गस्तीवर पाठवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची त्यासाठी विशेष भरती होणार आहे. तसेच मास्क परिधान न करता आढळणार्‍या व्यक्तींची रवानगी थेट सक्तमजुरीसाठी करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग आपल्या देशात झाला नसल्याचा दावा उत्तर कोरियाकडून वारंवार करण्यात येत आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशात कठोर प्रतिबंधांची अंमलबजावणी सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com