अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल
देश-विदेश

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

दिल्लीतील करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकारने एकत्र काम केले आहे, याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल बोलताना म्हणाले, "दिल्लीतील करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून ८८ टक्के झाले आहे. आता ८ टक्के रुगणावरच सध्या उपचार सुरू आहे. यातील २ ते ३ टक्के लोकांचा यात दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तसेच मागील काही दिवसापेक्षा मृत्यूचे आकडे देखील कमी झाले आहे."

दिल्लीत आतपर्यंत एकूण १३०६०६ रुग्ण आढळले असून त्यातले ११४८७५ रुग्ण बरे झाले आहे. तर ११९०४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आतपर्यंत ३८२७ लोकांचा यात मृत्यु झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com