Good news : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर!

Good news : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर!

नवी दिल्ली New Delhi

अवघ्या जगासाठी (the world) एक आनंदाची बातमी (Good news) आहे. जगात 800 कोटीव्या (800 crore) बाळाचा जन्म (birth of a baby) झाला आहे. लोकसंख्येवर नजर ठेवणार्‍या https://www.worldometers.info/ या संकेतस्थळाने मंगळवारी दुपारी दीड वाजता या बाळाचा जन्म झाल्याची पुष्टी केली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्येवरील अहवालातही यंदा 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या 800 कोटींवर पोहोचणार असल्याचा दावा करण्यात आला होता. लोकसंख्या वाढीच्या या आकडेवारीतील विशेष गोष्ट म्हणजे मागील अवघ्या 24 वर्षांतच जगाची लोकसंख्या तब्बल 200 कोटींनी वाढली आहे. 1998 मध्ये जगाची लोकसंख्या 600 कोटी होती. ती 2010 मध्ये वाढून 700 कोटी झाली. पुढील 12 वर्षांत म्हणजे 2022 मध्ये लोकसंख्येत आणखी 100 कोटींची भर पडली. त्यानंतर आज मंगळवारी 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगात 8 अब्जाव्या म्हणजे 800 कोटीव्या बाळाचा जन्म झाला.

ख्रिस्त जन्मापासून जगातील लोकसंख्येचा डेटा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला मागील 2 हजार वर्षांपासूनची लोकसंख्येची आकडेवारी पाहता येते. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, ख्रिस्तांच्या जन्मावेळी जगाची लोकसंख्या जवळपास 20 कोटी होती. त्यानंतर 100 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 1800 वर्ष लागले. त्यानंतर 100 कोटींहून 200 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी जगाला 130 वर्षे लागली.

औद्योगिक क्रांतीसोबत आरोग्य सेवांतही अमुलाग सुधारणा झाली. त्यामुळे जन्माला येणार्‍या मुलांच्या व डिलिव्हरीवेळी मृत्यू होणार्‍या महिलांच्या संख्येत घट झाली. यामुळे लोकसंख्येत वेगवान वाढ झाली. पुढील 30 वर्षांत जगाची लोकसंख्या 200 कोटींहून 300 कोटींवर पोहोचली. त्यानंतर अवघ्या 14 वर्षांतच लोकसंख्या 300 कोटींहून 400 कोटींवर पोहोचली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com