देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८ लाखाच्या वर
देश-विदेश

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८ लाखाच्या वर

शात चाचण्या अधिक होत असल्यामुळे नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात चाचण्या अधिक होत असल्यामुळे नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ६५२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने २८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ इतकी झाली आहे. आतापर्यंतस २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ५३ हजार ८६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com