दिल्ली l Delhi

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती.

त्यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत, महेंद्रसिंह टिकैत व आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले व्यासपीठ कोसळले आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी ५० खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. त्याच दरम्यान टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळल्याची घटना घडली आहे.