सीरम इंस्टीट्युटने 'Covishield' लसीची मानवी चाचणी थांबवली

ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती
सीरम इंस्टीट्युटने 'Covishield' लसीची मानवी चाचणी थांबवली

पुणे | Pune

ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने(Oxford University) बनवलेली करोनाची लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आले होते. यानंतर ही करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली होती. भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने(Serum Institute) काल सांगितले होते. मात्र आज पुन्हा या चाचण्या थांबवण्यात आल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने(Serum Institute) सांगितले आहे की, "आम्ही परिस्थितीची पाहणी करत आहोत. AstraZeneca जोपर्यंत ट्रायल्स सुरु करत नाहीत तोपर्यंत भारतातील लसीची मा्नवी चाचणी थांबवण्यात आली आहे. आम्ही Drug Controller General of India च्या नियमांचे पालन करत आहोत. त्यामुळे आम्ही लसीच्या पुढील चाचण्या करु शकणार नाही," असे सीरम इंस्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्‍परिणाम दिसू लागले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com