
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
तेलंगणातील (Telangana) मेहबूब नगरमध्ये (Mehboob Nagar) एक स्कूल बस (School Bus) पुराच्या पाण्यात (Flood) अर्धी बुडाली होती. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी (Students) होते...
बस (Bus) पाण्यात अडकताच विद्यार्थ्यांनी भीतीने मदतीसाठी आरडाओरडा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
यामुळे आसपासच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी पाण्यात उतरुन विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी घडल्याचे समजते.
लोकांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ट्रॅक्टरच्या साहाय्याने बसदेखील बाहेर काढण्यात आली आहे.