दिल्ली | Delhi
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र चाचण्यांची संख्या वाढवली असल्यामुळे रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. मात्र
राजधानी दिल्लीमध्ये रूग्ण संख्या वाढत असताना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांहून अधिक आहे. अशी माहिती आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच येत्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या दुप्पट होईल असे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.