
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
अमृतसर येथील श्री गुरु रामजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूरला रवाना होणाऱ्या स्कूट एअरलाइन्सच्या एका विमानाने आपल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच उड्डाण घेतले...
यामुळे ३२ आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळावरच अडकले. त्यानंतर प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातल्याचे दिसून आले. सिंगापूरला जाण्यासाठी विमानाची नियोजित वेळ रात्री ८ वाजेची होती,
परंतु एअरलाइन्सने ती दुपारी ३.५० वाजता शेड्यूल केली होती, अशी माहिती अमृतसर विमानतळाचे संचालक व्ही के सेठ यांनी दिली आहे. जवळपास २६३ प्रवासी वेळेवर पोहचले होते. परंतु मला समजले की ३२ प्रवासी ज्यांनी एका विशिष्ट ट्रॅव्हल एजंट मार्फत तिकीट खरेदी केले होते.
ते विमानाची वेळ आठ वाजेची असल्याचे लक्षात घेऊन विमानतळावर पोहचले होते. कदाचित त्या एजंटने विमानाच्या वेळेतील बदलाबाबत त्या प्रवाशांना कळवले नाही. असे सेठ यांनी स्पष्ट केले आहे.