लहान मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता

AIIMS च्या प्रमुखांची माहिती
लहान मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता

दिल्ली | Delhi

देशात करोनाची दुसरी लाट सध्यातरी ओसरत असतानाच दुसरीकडे करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतात लवकरच करोनाची तिसरी लाट येऊ शकते. तसेच लहान मुलांवर या लाटेचा परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळणार असल्याची शक्यता आहे, असे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. डॉ. गुलेरिया म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या फेज दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.

२ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. १२ मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज २ आणि ३ चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

Related Stories

No stories found.