देशातील करोना बाधितांची संख्या 15 लाखाच्या पुढे
देश-विदेश

देशातील करोना बाधितांची संख्या 15 लाखाच्या पुढे

गेल्या 24 तासात 768 रुग्णांचा मृत्यू

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 48,512 करोना बाधित आढळले आहे. तसेच गेल्या 24 तासात 768 रुग्णाचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.

देशातील एकूण बाधितांची संख्या 15,31,669 वर पोहचली असून 9,88,029 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर 5,09,447 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com