देशात करोना रुग्णांमध्ये होतेय घट

देशात आज सकाळी 7 वाजेपर्यंत 8 लाखाहून अधिक आरोग्यसेवा कर्मचार्‍यांचे लसीकरण
करोना
करोना

मुंबई | Mumbai

देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, करोनाचा वेग देखील मंदावला आहे. देशात आज सक्रिय रुग्णांची संख्या 1,92,308 इतकी आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या आता कमी होऊन 1.81% झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आणि नवीन रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय प्रकरणात 4,893 ची घट नोंदवण्यात आली. देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 7,689 आहे. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 73% हे केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यात आहेत.

दरम्यान देशात आज (21 जानेवारी) सकाळी 7 पर्यंत एकूण 8,06,484 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 2,398 सत्रामध्ये 1,31,649 लोकांना लस देण्यात आली.

देशात गेल्या 24 तासात 15,223 जणांना करोनाची लागण झाली असून, 151 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 6 लाख 10 हजार 883 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 1 लाख 92 हजार 308 जणांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 52 हजार 869 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 65 हजार 706 जणांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com