नवे कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचेच

केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचा पुनरुच्चार
नवे कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचेच

नवी दिल्ली / New Delhi - केंद्र सरकारने तयार केले नवे कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे.

दिल्लीत कायद्याविरोधात सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज संसद सदनाबाहेर माध्यमांशी बोलताना तोमर यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

केंद्र सरकारने या कायद्याबाबत सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा केली असून, अजूनही या कायद्यातील प्रत्येक तरतुदीच्या मुद्द्याच्या आधारे कोणाला चर्चा करायची असल्यास सरकारची तयारी आहे, असेही नरेंद्र सिंग तोमर म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com