Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

दिल्ली | Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session Of Parliament) १९ जुलैपासून सुरू होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. पावसाळी अधिवेशनात एकूण १९ दिवस कामकाज चालणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(Loksabha Speaker Om Birla) यांनी दिली आहे.

ओम बिर्ला यांनी सांगितले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होईल आणि ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. या सत्रामध्ये १९ बैठका होतील. ओम बिर्ला यांनी पुढे सांगितले की संसदेचे ग्रंथालय डिजिटल केले जाईल. यामध्ये १८५४ पासून ते आत्तापर्यंतची सर्व कार्यवाही डिजिटल करण्यात येईल. यासह, १०० % ई-नोटीसचे लक्ष्य आहे. प्रश्नांची उत्तरही डिजिटल असतील.

Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
Petrol-Disel Price : डिझेलच्या दरात काहीशी घट पण पेट्रोलचा भडका कायम, जाणून घ्या आजचे दर

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व विस्तृत व्यवस्था सभागृहात केल्या जातील, जेणेकरुन सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू शकेल. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु देशातील बर्‍याच राज्यांत अद्यापही संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आम्ही करोनाच्या नियमांचे पालन करूनच सर्व व्यवस्था केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कोरोना लस घेतली नाही अशा लोकांना अधिवेशनासाठी, संसद आवारात प्रवेश करण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) करण्यास सांगितले जाईल. ३२३ खासदारांचे लसीकरण झाले आहे, तर काही वैद्यकीय कारणांमुळे २३ खासदार लसीचा पहिला डोसही घेऊ शकले नाहीत.

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करेल. उत्तर प्रदेशातील नुकत्याच झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेला हिंसाचार, करोना लसीकरण (Corona vaccination) किंवा करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी, शेतकरी चळवळ, महागाई या सर्व मुद्दयांवरून विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. याचबरोबर, कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही संसदेत पुन्हा एकदा होऊ शकते.

Parliament Monsoon Session : १९ दिवस चालणार संसदेचे पावसाळी अधिवेशन, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
Corona Update : भारतातील रिकव्हरी रेट ९७.२२ टक्क्यांवर, आतापर्यंत तीन कोटी रुग्णांची करोनावर मात

दुसरीकडे, संसदेचे जास्तीत जास्त कामकाज कोणत्याही अडथळाविना करता येईल, याची खात्री करुन घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. तसेच, या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार जास्तीत जास्त बिले मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते. संसदेत ४० हून अधिक बिले प्रलंबित आहेत. पाच अध्यादेशांनाही बिलाचे स्वरूप दिले जाऊ शकते. सध्या होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल (दुरुस्ती) अध्यादेश, इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि त्यालगतच्या क्षेत्रातील वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि न्यायाधिकरण सुधारणा (युक्तिवाद आणि सेवा अटी) अध्यादेश लागू आहे. या अधिवेशनात विधेयक स्वरूपात हे अध्यादेश आणले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर संपते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकट काळात १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगांमध्ये काचांचे आवरण अशा अनेक पद्धतीने करण्यात आली होती. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे आवरणही लावण्यात आले होते. इतकेच नाही तर उभे राहून बोलण्यास मनाई करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com