तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) काही नियमांत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं अनारक्षित तिकिटांवर (Unreserved tickets) मोठा निर्णय घेतला आहे....

आता तुम्ही प्रवास सुरू करण्याच्या स्टेशनपासून पूर्वीपेक्षा जास्त अंतरावरून अॅपद्वारे घरी बसून तिकीट बुक करू शकाल. ज्या स्थानकापासून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्टेशनपासून तुम्ही खूप दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता.

अनारक्षित तिकिटांवर या सवलतीमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. आतापर्यंत तुम्ही प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून 2 किमी दूर अॅपद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करू शकत होता. मात्र रेल्वेच्या नव्या नियमामुळे तिकीट बुकिंग सुविधा अत्यंत सुलभ होणार आहे.

तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय
व्हॉट्सअ‍ॅपचे 'कम्युनिटी फिचर' म्हणजे नेमके काय? कसा कराल वापर? जाणून घ्या

दरम्यान, रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशी दोन प्रकारची तिकिटे बुक केली जातात. आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा अॅपद्वारे कुठूनही कोणत्याही ठिकाणासाठी बुक केली जाऊ शकतात, परंतु अनारक्षित तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या स्थानकापासून मर्यादित अंतरापर्यंतच बुक करता येतात. मात्र आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आले आहे.

तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

भारतीय रेल्वेच्या नवीन प्रणालीनुसार, उपनगरी नसलेल्या वर्गांसाठी, पाच किलोमीटरऐवजी, 20 किलोमीटर अंतरावरूनही अनारक्षित तिकीट बुक करता येणार आहे. याशिवाय उपनगरीय विभागासाठी तिकीट बुक करण्यासाठी हे अंतर दोन किमीवरून पाच किमी करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com