पुरेशा प्रमाणात लस पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध - पंतप्रधान

देशातल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी साधला संवाद
पुरेशा प्रमाणात लस पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध - पंतप्रधान

नवी दिल्ली -

देशात पुरेशा प्रमाणात करोना प्रतिबंधक लस पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी बुधवारी देशातल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व समुदाय संस्था, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांची एकत्रित शक्ती वापरण्याची गरज आहे, सर्वाधिक वेगाने दहा कोटी लोकांचे लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून लसीकरण उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला, असे ही मोदी म्हणाले. यासाठी देशात नवीन लसीकरण केंद्र उघडली गेली. लोकांना त्यासाठी उद्युक्त केलं गेलं. यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबंधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील, असेही मोदी म्हणाले.

गेल्या वर्षभरात कोविड आपत्तीला सामोरे जाताना जनतेनं दिलेल्या सहकार्याची मोदी यांनी प्रशंसा केली. जनतेच्या याच भावनांना आता पुन्हा एकदा नव्यानं उजागर करण्याची आणि त्यांना सक्रीय करण्याची गरज आहे.

सरकारी, निमसरकारी, अशासकीय, स्वयंसेवी अशा विविध स्वरूपात काम करणार्‍या देशातील संस्था-संघटनांच्या सामुहिक ताकदीचा उपयोग करून घेत हे संकट परतवून लावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असं आवाहनही मोदी यांनी केलं.

जागतिक महामारी विरोधात लढण्यासाठी चाचण्या, देखरेख आणि उपचारांची रणनीती राबविणे आवश्यक आहे. राज्यपालांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कार्य करावे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एक संघ म्हणून एकत्र काम करा,

कोविड संकटाचा सामना करण्यासाठी राज्यपालांनी राज्य सरकारांना सहकार्य करावे आणि या प्रयत्नांना जनआंदोलनाचं स्वरूप द्यावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या वेळी केलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com