
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकन एयरलाइन्सच्या बोइंग -७३७ हे विमान नेपाळहून दुबईच्या दिशेने येत असताना विमानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळे ५० नेपाळी प्रवाशांसह एकूण १६९ प्रवाशांची तारांबळ उडाली होती...
त्रिभूवण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतली. विमान आकाशात असताना एका हंस पक्षाची धडक बसली. धडकेनंतर विमानाला अचानक आग लागली होती. विमानाला आग लागल्यावर विमान सुमारे २५ मिनीटे हवेतच उडत होते. त्यानंतर विमान खाली उतरवण्याचे काम सुरु झाले.
जेव्हा विमानाला बाहेरुन आग (Fire) लागली तेव्हा विमान आकाशातच होते. आम्हाला आपातकालीन लँडींग करायचे होते. त्यामुळे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर याची माहिती दिल्यानंतर विमान खाली उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, असे पायलटने सांगितले आहे.