करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो - एम्स प्रमुख

करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो - एम्स प्रमुख

नवी दिल्ली - करोनाचा नवीन डेल्टा प्लस नावाचा विषाणु चिंतेचे प्रमुख कारण बनू शकतो तसेच हा नवीन विषाणु लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो अशी शंका आहे असे एम्स संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया AIIMS chief Dr. Randeep Guleria यांनी म्हटले आहे. All India Institute Of Medical Science (AIIMS)

ते म्हणाले, भारतात ‘बी1.617.2’ जातीच्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव आढळून येत होता. आता याच विषाणुने ‘के417एन’ चे स्वरूप धारण केले असून यालाच डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणतात. याच जातीचा नवा विषाणुचा प्रकार भारतासाठी अधिक चिंताजनक ठरू शकतो. ब्रिटन मध्ये याच विषाणुंचा सध्या मोठा प्रसार सुरू झाला आहे. ही बाब भारताने लक्षात ठेवण्याची गरज आहे.

भारतात करोनाच्या संबंधातील काळजी नीटपणे घेतली गेली नाही तर या नवीन विषाणुचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा प्रकारच्या विषाणुंचा नवीन अवतार आहे. हा नवीन अवतार नेमका काय प्रादुर्भाव निर्माण करणार याकडे जाणिवपुर्वक लक्ष देण्याची गरज आहे. हा नवीन विषाणु लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो अशी शंका आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले औषधोपचार किंवा लसीकरण यामुळे तो कितपत नियंत्रणात येईल हे पहावे लागेल.

करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो - एम्स प्रमुख
उद्यापासून 75 टक्के करोना लसी राज्यांना मोफत मिळणार

तर गंभीर दुष्परिणाम -

त्यामुळे विषाणुच्या या नवीन प्रकाराला आपण सहजपणे घेऊन चालणार नाही. त्यामुळे नवीन विषाणुचा अवतार निर्माण झाला आहे त्यापासून आपण सावध राहण्याची गरज आहे. जर आपण सावध राहिलो नाही तर येत्या तीन ते चार महिन्यात त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील असा इशाराही डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.