ज्ञानवापी मशीद खटल्याबाबत आज निर्णय

ज्ञानवापी मशीद खटल्याबाबत आज निर्णय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेशातातील (Uttar Pradesh) वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanwapi Mosque) खटल्याबाबत आज वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालय (Court) निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे...

सुनावणीपूर्वी वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.

निकालानंतर परिसरातील शांतता टिकवण्यासाठी स्थानिक धार्मिक नेत्यांशी संवाद साधण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढण्याचे निर्देशही पोलिसांना (Police) आयुक्तांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या सीमा, हॉटेल्ससह सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com