दिल्ली l Delhi

दिल्लीचे नागरिक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात होते तो आज अखेर आलाच. पंतप्रधान मोदीींचं स्वप्न आज पूर्ण होणार असून दिल्लीतील नागरिकांना चालकाशिवाय चालणाऱ्या मेट्रो ट्रेननं प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्वयंचलित मेट्रोचं उद्घाटन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील पहिली स्वयंचलित मेट्रो ट्रेन दिल्ली येथे सुरू केली. जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत मेट्रोच्या km 37 किमी लांबीच्या किरमिजी मार्गावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे लोकांना मेट्रोच्या प्रवासाचा नवा अनुभव मिळेल, तसेच तो सुरक्षितही असणार आहे. त्याची यंत्रणा अशी आहे की जर दोन गाड्या एका ट्रॅकवर आल्या तर त्या आपोआप थांबतील.

पहिल्या टप्प्यात ड्रायव्हरलेस ट्रेन जनकपुरी वेस्ट ते नोएडा बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत मॅजेन्टा मार्गावर एकूण 37 किमी अंतर कापणार आहे. त्यानंतर, 2021 मध्ये, पिंक लाइनमध्ये 57 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो चालविण्याची योजना आहे. जे मजलिस पार्क ते शिव विहार पर्यंतचे अंतर व्यापेल. अशा प्रकारे एकूण 94 किलोमीटर चालकविरहित गाड्या सुरू करण्याची मोदी सरकारची योजना आहे.

नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, दिल्लीतील मेट्रोसाठी गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु होती पण पहिली मेट्रो अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नाने ती चालवली गेली. तसेच आज नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्डच्या माध्यमातून ही मेट्रो जोडल्या जात आहेत. गेल्या वर्षात अहमदाबाद मध्ये याची सुरुवात झाली होती. आज याचा विस्तार दिल्लीत मेट्रोच्या विमानतळावरील एक्सप्रेस लाइनवर होत आहे.

तर 2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रो धावली होती. पण आता 18 शहरांमध्ये ही सुविधा चालवली जात आहे. येत्या 2025 पर्यंत आम्ही 25 हून अधिक शहरात चालवणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 2014 मध्ये देशातील फक्त 248 किलोमीटर मेट्रो लाइन्स ऑपरेशनल चालवली होती. परंतु सध्याच्या घडीला तिप्पट पटीने म्हणजेच सातशे किमी पेक्षा अधिक आहे. पुढे मोदी यांनी असे ही म्हटले की. मेट्रो सर्विसच्या विस्तारासाठी मेक इन इंडिया हा उपक्रम फार महत्वपूर्ण आहे. त्यामुळे याचा खर्च कमी होऊन, विदेश चलन वाचते आणि देशातील बहुतांश लोकांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच ज्या शहरात पाणी मोठ्या प्रमाणात आहे तेथे आता वॉटर मेट्रोवर काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराला उत्तम कनेक्टिव्हिसह त्यांच्या सध्याच्या बेटातील लोकांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा लाभ घेता येईळल. कोची मध्ये हे काम वेगाने सुरु आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते कॉमन मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन करण्यात आले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून तुम्ही कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, यासाठी हे एकच कार्ड तुम्हाला उपयोगी पडेल, असं मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आधुनिक मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच दिल्ली मेट्रोचा समावेश आता जगातील काही निवडक शहरांमध्ये झाल्याचे सांगताना दिल्लीत वेगानं विकास होत असल्याचंही ते म्हणाले.

स्वयंचलित मेट्रोची 3 प्रमुख वैशिष्ट्ये

1. या मेट्रोची यंत्रणा इतकी सुरक्षित आहे की दोन ट्रेन एकाच मार्गावर आल्यास त्या आपोआप काही अंतरावरच थांबतील.

2. मेट्रोत प्रवास करताना अनेकदा धक्क्यासारखा जो अनुभव होतो, तो स्वयंचलित ट्रेनमध्ये होणार नाही.

3. ट्रेनमध्ये चढ-उतार करताना प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

याची प्रणाली कशी कार्य करते?

स्वयंचलित मेट्रोचा प्रवास संचार आधारित ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम (सीबीटीसी) ने सुसज्ज आहे. ही यंत्रणा एका वाय-फाय प्रमाणे काम करते. हे मेट्रोला सिग्नल देते, त्यामुळे ट्रेन चालते. मेट्रो ट्रेनमध्ये असलेले रिसीव्हर सिग्नल मिळाल्यानंतर मेट्रोला पुढे नेते. परदेशात अनेक मेट्रोमध्ये याच यंत्रणेचा वापर केला जातो.