'त्या' चीनी नागरिकांनी मानले भारतीय सैन्याचे आभार !

भारत आणि चीन मधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत
'त्या' चीनी नागरिकांनी मानले भारतीय सैन्याचे आभार !
Courtesy : ANI

दिल्ली | Delhi

काही दिवसापूर्वी भारत आणि चीन यांच्यातील संघर्षानंतर या दोन देशातील संबंध तणाव पूर्ण आहे. भारताने देखील चीन विरोधात कारवाई सुरू केली आहे. चीनच्या कुरापती सुरूच आहे. मात्र भारत नेहमीच माणुसकीला प्राधान्य देत आला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे 3 सप्टेंबरला

उत्तर सिक्कीम मध्ये बघायला भेटलं. आपल्या भारतीय सैनिकांनी तीन चीनी नागरिकांचे प्राण वाचवले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिक्कीम मधील उत्तर भागातील पठारावर जवळपास १७ हजार ५०० फूट उंचीवर चीनी लोकांची मदत केली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. हे तीन चीनी प्रवासी रस्ता आपला रस्ता चुकले होते. त्यातील एका प्रवश्याला श्र्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Courtesy : ANI

भारतीय जवानाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या चीनी प्रवश्यांसाठी ऑक्सिजन, थंडीचे कपडे आणि जेवण याची सुविधा केली. तसेच त्यांना जाण्यासाठी मार्गदर्शन केले. त्या चीनी नागरिकांनी जातानी भारतीय सैनिकांचे आभार मानले.

Courtesy : ANI
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com