हवेतूनही पसरतोय करोना

केंद्र सरकारने जारी केली नवी गाईडलाईन
हवेतूनही पसरतोय करोना
करोना अपडेट

नवी दिल्ली - करोनाचा प्रसार प्रामुख्याने हवेतून होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी गाईडलाईन (नियमावली) जारी केली आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे, करोनाचा प्रसार प्रामुख्याने हवेतून होत आहे. तसेच करोना बाधित रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून अथवा बोलताना करोना व्हायरस बाहेर पडत आहे. त्यातून करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. याआधीच्या गाईडलाईनमध्ये केंद्र सरकारने म्हटलं होतं की, करोनाचा संसर्ग केवळ करोना बाधिताच्या संपर्कात आल्यानंतरच होतो.

नव्या गाईडलाईननुसार करोना बाधित व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकेमुळं करोना व्हायरस 10 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी आता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि योग्य व्हेंटिलेशन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. संक्रमित व्यक्तीपासून ड्रॉपलेट 2 मीटरपर्यंत तर एरोसोल्स 10 मीटरपर्यंत जातात. याआधी कमीत कमी 6 फूट म्हणजे 1.8 मीटर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

उपचारासंदर्भात म्हटलं की, करोनाचे कमी लक्षणे असलेल्या रुग्णाला आयवरमेक्टीन औषध रिकाम्या पोटी दिवसातून एकदा दिले जाऊ शकते. मात्र गर्भवती महिलांना हे औषध देऊ नये. तसेच कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड देण्याची आवश्यकता नाही. मात्र लागण झाल्याच्या 7 दिवसानंतरही ताप किंवा खोकला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ओरल स्टेरॉईड देता येऊ शकते, असेही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com