आता केंद्राकडून नवी नियमावली, 'अशी' असणार बंधनं

करोना
करोना

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशात करोना (Corona) रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स (New guidelines) जारी करण्यात आल्या आहेत...

नव्या गाईडलाईन्सनुसार आता विमान आणि रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी बंधनकारक नसेल. सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी करताना म्हंटले आहे की, आता ७२ तासांपुर्वीची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असणार नाही. मात्र करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र (Certificate) बंधनकारक करण्यात आले आहे.

आता प्रवासी संपूर्ण लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्र दाखवू शकतात. ज्या प्रवाशांनी हवाई सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फोर्ममध्ये माहिती भरली आहे आणि निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा करोना लसीकरण प्रमाणपत्र अपलोड केला आहे, अशा प्रवाशांना एअरलाईन बोर्डिंगची परवानगी मिळेल.

करोना
अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

तसेच हाय रिस्क ओमायक्रोन असलेल्या विविध देशांसाठी ॲट रिस्क मार्किंग समाप्त करण्यात आले आहे. याशिवाय ७ दिवसांच्या क्वारंटाईनचे (Quarantine) नियम काढून टाकण्यात आले आहे. तर सर्व प्रवासी आगमनाच्या पुढील १४ दिवसांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घरीच घेतील असे केंद्राने म्हटले आहे.

करोना
Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com