साेने
साेने
देश-विदेश

साेने प्रथमच ५४ हजारावर

चांदीही पाेहचली ७० हजार प्रतिकिलाेवर

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

करोनाच्या काळात सोन्याच्या किंमतीने आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. गेल्या २४ तासात सोन्याचा भाव तब्बल ३ हजार रुपयांनी वाढला असून प्रतीतोळा ५४ हजाराच्या पुढे गेला आहे.

आज सोन्याचा दर ५४ हजार ८२८ रुपये आहे. तसेच चांदीच्या दराने देखील मोठी उसळी घेत ७० हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहे. वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे. गेल्या दीड वर्षातील सोन्याची सर्वात मोठी दरवाढ आहे.

Deshdoot
www.deshdoot.com