अंदाधुंद गोळीबारात १० जणांचा मृत्यू

अंदाधुंद गोळीबारात १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

मेक्सिकोमधील (Mexico) एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार (Indiscriminate firing) केल्याने १० जणांचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मे महिन्यात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता.

तसेच मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात १९ लोकांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. त्यात अनेकजण जखमी होते. तर जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com