करदात्यांसाठी अधिकारपत्र
देश-विदेश

करदात्यांसाठी अधिकारपत्र

सीतारामन यांची घोषणा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

देशातील प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकार पत्र आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली. Taxpayers

करदाते राष्ट्रनिर्माते आहेत, करदात्यांना अधिक सुविधा मिळाव्या म्हणून सरकार त्यांच्यासाठी काही घोषणा करणार आहे, सुलभीकरण आणि पारदर्शी प्रक्रियेसोबत करांच्या रचनेत करदात्यांना अनुकूल असे बदल केले जाणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकार प्रामाणिक करदात्यांना अधिक चांगली सेवा मिळावी, म्हणून गंभीरपणे विचार करीत आहे, करदात्यांसाठी काही महत्त्वपूर्ण सवलती असणारे घोषणापत्र सरकार जारी करणार आहे.

करदात्यांसाठी करांची रचना अधिक सुलभ आणि सुगम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांसाठी चार्टरची घोषणा करण्यात आली होती, त्याला या घोषणापत्रामुळे घटनात्मक दर्जा मिळणार आहे.

ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत करदात्यांसाठी घोषणापत्र आहे, यातून देशाबद्दलच्या कर्तव्याची जशी जाणीव करून देण्यात आली, तसेच अधिकाराचीही माहिती देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातून अशा घोषणापत्राचे संकेत देण्यात आले होते. ते सरकारने प्रत्यक्षात आणले आहे असेही त्या म्हणाल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com