करदात्यांना दिलासा; आयकर भरा आता ३० सप्टेंबरपर्यंत
देश-विदेश

करदात्यांना दिलासा; आयकर भरा आता ३० सप्टेंबरपर्यंत

प्राप्तिकर विभागाने तिसऱ्यांदा आयकर भरण्याची मुदत वाढवली

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

आर्थिक वर्ष 2018-2019 साठी सरकारने आयकर भरण्याची तारीख दोन महिन्यांपर्यंत वाढवली आहे. आता आयकर 30 सप्टेंबर भरता येणार आहे. या आधी 31 जुलै पर्यंत आयकर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने ट्विटमध्ये म्हंटले आहे, "करदात्यांना करोना साथीच्या काळात सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्रीय विभागाने आता ही तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे."

प्राप्तिकर विभागाने तिसऱ्यांदा आयकर भरण्याची मुदत वाढवली असून या निर्णयाने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com